जळगाव रनर्स ग्रुपच्या २५ सदस्यांनी ब्रह्मगिरी नाशिक मॅरेथॉनमध्ये नोंदविला सहभाग

0
8

साईमत जळगाव प्रतिनिधी

भारतातातील नामांकित मॅरेथॉनपैकी एक अशी ओळख असलेल्या ब्रह्मगिरी नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत जळगाव रनर्स ग्रुपच्या २५ सदस्यांनी सहभाग नोंदविला. मॅरेथॉनमध्ये यावर्षी दोन हजार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात जळगाव रनर्स ग्रुपचे ५ पुरुष व 20 महिलांनी आपला सहभाग नोंदविला.

ब्रह्मगिरी नाशिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी किमान ३ ते ४ महिन्यापूर्वी नोंदणी आवश्यक असते त्यासाठी जळगाव रनर्स ग्रुपच्या सदस्यांनी जळगाव शहर, बहिणाबाई विद्यापीठ, मेहरूण तलाव ट्रॅक याठिकाणी दररोज रनिंगचा सराव केला.
डॉ.सीमा पाटील, डॉ.जयश्री राणे, डॉ.सोनाली जैन, प्रणिता चोरडिया, वैशाली बडगुजर, जयश्री पाटील, दीपमाळा काळे, पिंटू काळे, रसिका भोळे, सुचिता हाडा, अतुलसींग हाडा, गजानन सपकाळ आदींनी २२ किलोमीटर वेळेच्या आत ब्रह्मगिरी नाशिकमॅरेथॉन पूर्ण केली.
जास्तीत जास्त वेगाने धावत स्पर्धा पूर्ण करणे हे खरोखर आव्हानात्मक आहे.असा आत्मविश्वास आपल्यात असणे जरूरीचे आहे.८ आठवडे आधी जळगाव शहरात व त्या वातावरणात शारीरिक कष्टाचा सराव तर केलाच पण ब्रह्मगिरी नाशिक मॅरेथॉन नतर पुढील मॅरेथॉनचे मानसिक आव्हान पेलण्यासही समर्थ झालो असे प्रतिक्रिया डॉ. सीमा पाटील यांनी दिली.
उत्कृष्ट आयोजनासाठी देखील हि मॅरेथॉन संस्मरणीय ठरली कारण वाटेत ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक, सुमारे दर ३ किमी नंतर पाण्याचे ठिकाण, इतर पोषक पेये,केळी, इत्यादींची व्यवस्था चोख होती. वाटेतील नागरिक आनंदाने टाळ्या वाजवत धावपटूंचा उत्साह वाढवत होते. आयोजकांचे सर्व धावपटूंवर लक्ष्य होते. आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जात होती. याशिवाय स्थानिक प्रशासन देखील धावपटूंना विशेष प्रोत्साहित करीत होते. तसेच त्यांनी कायदा व सुव्यवस्था अतिशय चोखपणे बजावली असे सर्व धावपटूंनी सांगितले.
सर्व यशस्वी धावपटूंचे जळगाव रनर्स ग्रुपचे अध्यक्ष किरण बच्छाव,डॉ.प्रशांत देशमुख, डॉ.विवेक पाटील, डॉ.रवी हिरानी, विक्रांत सराफ, अविनाश काबरा, निलेश भांडारकर, डॉ.राहुल महाजन, उमेश महाजन, ज्ञानेश्वर बढे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here