साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
औरंगाबाद खंडपीठाने यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याची 29 कोटी रुपये रक्कम जप्त केली होती त्यापैकी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 16 कोटी रुपयांची रक्कम तात्काळ मिळायला पाहिजे तसेच मधुकर सहकारी साखर कारखाना विक्री करणे म्हणजे सर्व राजकीय पक्षासह मधुकर कारखाना सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दुर्भाग्य असल्याबाबत आता संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह सर्व राज्यात मधुकर या प्रसिद्ध कारखान्या बाबत जोरदार चर्चा सुरू झाली असून ऊस उत्पादक शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.
यावल तालुक्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याची सभासद संख्या अंदाजे 27हजार आहे त्यापैकी अडीच ते तीन हजार ऊस उत्पादक शेतकरी सभासद आहेत या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकूण 16 कोटी रुपये रक्कम गेल्या तीन वर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने मधुकर साखर कारखाना कार्यक्षेत्रातील संबंधित ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल होऊन मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत याचा औरंगाबाद खंडपीठाने गांभीर्याने आणि तात्काळ विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 16 कोटी रुपयांची रक्कम व्याजासह परत देण्याबाबत जिल्हा बँक जळगाव मार्फत तात्काळ कार्यवाही करावी अशी शेतकऱ्यांची एकमुखी मागणी होत आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जळगाव जिल्हा बँक व मधुकर साखर कारखाना यांच्या कायदेशीर सुरू असलेल्या बाबीमुळे गेल्या काही वर्षापासून उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार खंडपीठात प्रकरण दाखल आहे शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट मिळण्यासाठी कारखान्यातील साखर विक्री करून 29 कोटी रुपयांची रक्कम औरंगाबाद खंडपीठात जप्त केली होती त्यापैकी 10 कोटी रुपये जिल्हा बँकेने थकबाकी पोटी घेतले परंतु शिल्लक 19 कोटी रुपयांतून शेतकऱ्यांना 16 कोटी रुपये रक्कम अद्याप मिळालेली नाही आता या रकमेवर पुन्हा जळगाव जिल्हा बँकेने दावा केला असून निर्णय खंडपीठात प्रलंबित असला तरी खंडपीठाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ कायदेशीर कारवाई पूर्ण करावी याबाबत तसेच संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेला मधुकर साखर कारखाना राज्यातील एका माजी मंत्र्यांच्या व राजकीय द्वेषापोटी विक्री होत असल्याने तसेच रावेर लोकसभा मतदारसंघातील अभ्यासू आणि पावरफुल खासदार,आमदार, आणि माजी मंत्री यांनी आपला राजकीय व वैयक्तिक हेतू साध्य होण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मधुकरला वेळेवर जिल्हा व इतर माध्यमातून आर्थिक सहकार्य न केल्यामुळे मधुकर सहकारी साखर कारखान्याची सुरू असलेली विक्रीची प्रक्रिया म्हणजे सर्व राजकीय पक्षाचे आणि मधुकर साखर कारखाना सभासदांचे शेतकऱ्यांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल असे जळगाव जिल्ह्यात उघडपणे बोलले जात असून राजकारणातील विरोधकांसह सत्ताधारी गप्प असून कोणीही मधुकर साखर कारखान्याबाबत बोलायला पुढे येत नाही ही वस्तुस्थिती आणि शेतकऱ्यांचे दुर्भाग्य आहे.