जळगाव : युवा विकास फाउंडेशन व विष्णूभाऊ भंगाळे मित्र परीवार, जळगांव आयोजित केमिष्ट भुषण मा. सुनिलदादा भंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त या वर्षी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे ऑनलाईन व्हीडीओ पध्दतीने हनुमान चालिसा पठण स्पर्धा 2022“ घेण्यात आली.सदर स्पर्धेत 589 स्पर्धकांनी सहभाग नोंदवून व्हिडीओ पाठवले होते. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना सोमवार दि. 22 रोजी
सकाळी 10:30 वा. सरदार पटेल लेवा भवन, आंबेडकर मार्केटजवळ, जळगांव येथे बक्षीस वितरण समारंभ शासनाच्या नियमानुसार मोजक्या मान्यवर व बक्षिसपात्र विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रातिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी चिमुकले राम मंदिरातील प.पु.दादा महाराज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहूणे प.पु. शास्त्री स्वामी नयनप्रकाश दासजी महाराज स्वामी नारायण मंदिर संस्थान, जळगांव, केमिष्ट भुषण सुनिल भंगाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर, नगरसेवक मनपा जळगांव विष्णूभाउ भंगाळे, अतुलजी भगत, सचिव आयएमए जळगांव डॉ.स्नेहल फेगडे, सहमंत्री विश्वहिंदू परीषद देवगिरी प्रांत ललितभैया चौधरी, जगन्नाथ किनगे, केमीस्ट असो. जळगाव जिल्हा चे शामकांत वाणी, लखीचंद
जैन, यादव साहेब, चेतन साहेब, राजू पाटील सुपे मामा आदी उपस्थित होते सुरुवातीला हनुमानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले याप्रसंगी सर्वांनी सामुहीक हनुमान चालीसा पठण करुन केमिष्ट भुषण श्री सुनिल भंगाळे यांना
वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. प.पु. शास्त्री स्वामी नयनप्रकाश दासजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगून फक्त पोपटा सारखे हनुमान चालीसा पाठ न करता आपल्या जिवनात त्याचे आचरण करावे. व पुढील वर्षी आपण स्वामी नारायण मदिर येथे तयार होत असलेल्या
हनुमान मुर्तीच्या पायाजवळ पठण स्पर्धा घेउ अशी घोषणा करुन शुभ आशिर्वाद दिले. प्रास्ताविक डॉ.स्नेहल फेगडे यांनी तर सुत्रसंचालन अनुपमा कोल्हे, स्वाती पगारे यांनी केले आभार महेंद्र पाटील यांनी ‘. याप्रसंगी राजेश वारके, ललित महाजन, महेंद्र पाटील, प्रा सुरेश
अत्तरदे, बिपीन झोपे, तुषार वाघुळदे, एकनाथ पाचपांडे, शैलेश काळे, चेतन पाटील, विवेक महाजन, नेमीचंद येवले, प्रविण पाटील, हरीष कोल्हे, ललित खडके, राहूल चौधरी, विक्की काळे, सचिन पाटील, हर्षल चौधरी, नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, सचिन महाजन, दिपक भारंबे, विजय नारखेडे आदींनी परीश्रम घेतले.