पाचोरा : प्रतिनिधी
रस्त्यावरील सरकारी गटातील व वर्ग 2 जमिनीचे मालक रामदास पांडुरंग पांढरे यांच्या शेजारील गायरान व वर्ग दोनची जमीन कोरताना संदीप बापू ढाकरे दीपक बापू ठाकरे व अण्णा ठाकरे ,पवन ढाकरे ,योगेश आण्णा ढाकरे वरील सर्व व्यक्ती दोन वर्षापासून आमच्या शेतीच्या बाजूला सरकारी गट त्यांची शेती आहे या दोन्ही गटातून पाच ते सात लाख रुपयाचे मुरूम कुऱ्हाड तांडा बुद्रुक खुर्द व आसपासच्या खेड्यांना मुरूम विक्री केला आहे मुरूम कोरत असताना रात्री दोन वाजता शेजारील शेतकऱ्याने त्याच्या बांधावर कोरत असताना बघितले व त्या शेतकऱ्यांनी कायदेशीर कारवाई करील असे सांगितले असता त्यांनी त्या शेतकऱ्याला मारहाण केली व जिवंत मारण्याची धमकी दिली शेतकरी रामदास पांडुरंग पांढरे शेतकरी आर्थिक परिस्थितीने गरीब असल्याने दोन वर्षापासून शांत होता त्याला मारहाण केल्यानंतर पायाला लागले होते म्हणून त्यांनी करीत सर तहसीलदार साहेबांना करून पंचनामा करायला सांगितले व तहसीलदार साहेबांनी व तलाठी साहेबांनी पंचनामा केलेला आहे व जेसीपी व दोन ट्रॅक्टर जागेवर बंदिस्त केली आहे तरी पुढील कारवाई व्हावी अशी या शेतकऱ्याने मागणी केली आहे.