समाजातील सेवाभाव जपणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे ः ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर

0
17

जळगाव ः प्रतिनिधी
असामान्य कार्यकर्तृत्व असणाऱ्यांचा सन्मान आज झाला, सर्व पुरस्कारार्थी इथं पर्यंत त्यांच्या दुर्दम्य इच्छा शक्तीमुळेच पोहचले आहे.समाजातील साकारात्म कार्य आणि ते कार्य करणारी माणसे समाजापर्यत पोहचली पाहिजे.आपलं काम जो पर्यंत समाजपर्यंत पोहचणार नाही तो पर्यंत समाज त्यात सहभागी होणार नाही.समाजकार्य आता आधुनिक पद्धतीनेच करण्याची वेळ आली आहे.समाजात सेवा भाव वाढला पाहिजे आणि अश्‍या काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढली पाहिजे.रडण्याऐवजी लढण्याची प्रेरणा दिव्यांगांना दीपस्तंभच्या माध्यमातून दिली जात आहे हे उदाहरण सर्व समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन सचिन खेडेकर यांनी केले

राज्यस्तरीय दीपस्तंभ 2022 पुरस्काराचे वितरण रविवारी छत्रपती संभाजी राजे सभागृह जळगाव येथे झाले , त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास राज्यसभा खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उद्योजक दीपक शहा, डॉ.रेखा महाजन उपस्थित होते.यावेळी कुलगुरु डॉ.विजय माहेश्वरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.दीपस्तंभ प्रकाशित आणि एल.ए.पाटील लिखित सुसंस्कृत व्यक्तिमत्व या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

संस्थेची प्रज्ञाचक्षु विद्यार्थिनी नाझनीन शेख हिने माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे सुंदर गीत म्हटले आणि माउली अडकूर या दिव्यांग विदयार्थीनीने तिला हार्मोनियम वर साथ दिली.प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी पुरस्कार देण्यामागची भावना आणि जळगावात दिव्यांग, अनाथ आणि वंचितांसाठी उभारत असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पाची माहिती दिली.
समाजातील वाढत्या वेदना समजून घेण्यासाठी संवेदना वाढण्याची आवश्‍यकता आहे आणि समाजात त्या संवेदना वाढविण्याचे कार्य दीपस्तंभ सारख्या संस्था करीत आहे. समाजात विस्कटलेली मन बांधण्यासाठी संवेदनांचे पूल बांधणे गरजेचे आहे.दीपस्तंभने समाजात संवेदनांचे पूल बांधणारे हिरे शोधून त्यांना सन्मानित करून अनेकांना प्रेरणा देण्याचे कार्य केले आहे.आज समाजामध्ये सगळीकडे नकारात्मक भावना जाणवते पण अशा कार्यक्रमाद्वारे सकारात्मक काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मकता पसरवण्याचे कार्य होते असे प्रतिपादन खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

यांचा झाला गौरव
जीवन गौरव पुरस्कार – रमाकांत तांबोळी ( विदयार्थी सहाय्यक समिती )
विवेकानंद पुरस्कार – पाणी फाऊंडेशन ( डॉ.अविनाश पोळ ) आणि गीत- माणसाने माणसाशी माणसासम वागणे (गीतकार समीर सामंत )
युवा प्रेरणा पुरस्कार –
1) स्व.विशाल अहिरे यांना मरणोत्तर (स्नेहालय, अहमदनगर )
2) दानिश महाजन ( रेडिओ उडान, पठाणकोट )
3) मयुरी मदन सुषमा ( मिरॅकल फाउंडेशन )
4) मिशन 500 पाच पाटील टीम – ( प्रशांत गायकवाड, चाळीसगाव )
5) संदीप काळे (सकाळ वृत्तपत्र )
6) बुकलेट एप ( अमृत देशमुख )
7) गिरीश पाटील ( योगी फाऊंडेशन, वाघळूद )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here