धरणगाव : प्रतिनिधी
आज चा सामाजिक व्यवस्थेत अडकलेला समाजाला दिशा देण्याचे महान कार्य संत व महात्मा केले असुन संताचे सातशे वर्ष पुर्वीचा ग्रंथ वाड्मयत लिहलेल्या संदेशाची हुबेहुब पुनवृती होत असुन आज ही संताचे विचार व आचार जगाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय समाज प्रबोधनकार माईसाहेब महाराज यांनी केले. नुकत्याच येथील स्वर्गीय नामदेव महादु येवले यांचा प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त प्रवचनांच्या कार्यक्रम झाला त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
आपल्या दिड तासाच्या प्रबोधनात माईसाहेब यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज,संत मुक्ताबाई यांचा सारखे संत व महात्म्यानी आजची समाज व्यवस्थेत अडकलेला समाजाला दिशा देण्याचे महान कार्य केले असल्याचे नमुद करून ते म्हणाले की, आई वडील यांची सेवा ही इश्वर सेवा असुन त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत त्यांनी जन्म दिला लहान चे मोठं केले शिकवलं म्हणुन त्याची परोपकाराची परतफेड आपण कधीच करू शकत नाही असे नमुद करून आज ही अनेकांचे आई वडील वृध्द आश्रमात असल्याचे दुखः व्यक्त केले.
दुसरी कडे आई महत्व विषद करतांना ते म्हणाले की, जिजाऊनी छत्रपती शिवरायाना जन्म दिला त्यातुन शिवरायानी मोठे साम्राज्य स्थापन केलं असे समाजात व इतिहासात अनेक क्रांतिकारी महीला होऊन गेल्या असुन त्या देखील कोणाचा तरी आई आहेत म्हणुन आई वडीलांची सेवा करा त्यांना कष्ट न देता त्यांची परोपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन केले
कार्यक्रमा नंतर स्वर्गीय नामदेव महादु येवले यांची शोकसभा झाली त्यात कै. नामदेव सेठ येवले तसेच समस्त येवले परीवार यांनी समाज जिवनात केलेल्या सामाजिक व विधायक कार्याची माहीती आपल्या शोकभावनेतुन गुलाबराव वाघ, अॅड वसंतराव भोलाणे, जेष्ठ पत्रकार कडू महाजन, नगरसेवक कैलास माळी, चाळीसगाव येथील श्री. चिचोले, सुनिता पिगळे, तसेच एरंडोल येथील कोठावडे मॅडम सह आदि नी शोकभावना व्यक्त केल्या.