सोयगाव : प्रतिनिधी
अतिवृष्टीच्या २५% यातून राहिलेल्या नुकसानीच्या पोटी सोयगाव तालुक्यासाठी प्राप्त झालेल्या ६ कोटी ५१ लक्ष ३५ हजार ४१३ निधी सोमवारी २३ हजार ६५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याची माहिती रमेश जसवंत यांनी दिली आहे त्यामुळे ऐन टंचाईग्रस्त स्थितीत सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाअसून होळीच्या सणात मदत मिळाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे
सोयगाव तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसात रब्बीच्या पिकांसह भाजीपाल्याच्या क्षेत्राला मोठा फटका बसला होता त्यातच अवकाळी च्या नुकसानीचा पंचनामे होणार नसल्याचे संकेत मिळाले असताना आधीच संकटाच्या खाईत असलेल्या शेतकर्यांना पुन्हा नुकसानीचा पेच पडला आहे विहिरींनी तळ गाठल्याने आणि वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने फळबागा संकटात सापडल्या होत्या अशा स्थितीत अतिवृष्टीच्या उर्वरित अनुदानाची रक्कम ८ कोटी ५० लाख सोयगाव तहसील कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार रमेश जसवंत यांनी तातडीने तलाठ्यांना कामाला लावून शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्याचे आदेश दिले होते शनिवारी आणि रविवारी या दोन दिवस सुट्टी च्या दिवसातही तहसील कार्यालयात हा निधी वर्ग करण्याचे काम गतिमान झाले होते त्यामुळे सोमवारी तब्बल २३ हजार ६५८ शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने ६ कोटी ५१ लाख ३५ हजार इतका निधी बँकेत वर्ग झाला आहे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मदत जमा झाल्याने शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला आहे
बँकांना निर्देश, तातडीने रक्कम वितरित करा – तहसीलदार
अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा पहिला टप्पा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मिळावा यासाठी शासन स्तरावर यंत्रणा कामाला लागली होती त्याचप्रमाणे अंतिम टप्प्याची रक्कम होळी पूर्वी शेतकऱ्यांच्या पदरात पडावी यासाठी सोयगाव तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे त्यामुळे नुकसान भरपाई चा अंतिम टप्पा शेतकऱ्यांना होळीच्या सणाच्या पूर्वी मिळणार असून बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने वितरित करावे असे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.