शर्वरी निकमने पटकविला द्वित्तीय क्रमांक

0
35

जळगाव ः प्रतिनिधी
बहुजन जागृती मंच भुसावळ यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाइन व ऑफलाइन वक्तृत्व स्पर्धेचे पाच गटात आयोजन करण्यात आले होते.

त्यात लहान गटात शर्वरी विलास निकम (डॉ. अविनाश आचार्य विद्यालय, जळगाव) या विद्यार्थीनीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण व संविधानाची देण’ या विषयावर भाषण सादर करून द्वितीय क्रमांक मिळवला. डायएचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, अधिव्याख्याता शैलेश पाटील, बहुजन जागृती मंचचे अध्यक्ष राजेंद्र सुरवाडे व स्पर्धा समन्वयक आनंदा सपकाळे यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here