वीज चोरी प्रकरणी डॉक्टरास साडेनऊ लाखांचा दंड

0
15

साईमत मलकापूर प्रतिनिधी

येथील डॉ. प्रशांत पाटील यांनी ९ लाख ५९ हजार रुपयांची वीज चोरी केल्याची घटना ९ ऑगस्ट २०२३ रोजी उघडकीस आली. बुलढाणा येथील पथकाने गोपनीय माहिती वरून डॉ प्रशांत पाटील यांच्या दवाखान्यात धाड टाकुन कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे की, मलकापूर येथील चाळीस बिघा परिसरातील गणेश नगर येथील डॉ. प्रशांत पाटील यांच्या दवाखाना असुन या मध्ये महावितरण कंपनीचे वीज मीटर दत्तात्रय पांडुरंग पाटील या नावाने असुन या वीज मीटरचा वापर डॉ प्रशांत पाटील हे करीत असुन या वीज मीटर ची गोपनीय माहिती महावितरण कंपनीच्या बुलढाणा वीज चोरी पथकाला मिळाली त्या वरून मलकापूर येथे ९ ऑगस्ट रोजी बुलढाणा येथील पथक डॉ. प्रशांत पाटील यांच्या दवाखान्यामध्ये वीज मीटर तपासणी केली असता त्यांना या मीटर मध्ये छेडखानी केल्याचे आढळून आले, त्यामुळे बुलढाणा पथकाने त्याची शहानिशा करून त्या वीज चोरी मीटरचा पंचनामा करून डॉ. प्रशांत पाटील हे वीज मीटर मधील वीज वापरत असल्याने त्यांना तब्बल नऊ लाख 59 हजार 450 रुपयाचा वीज चोरी केल्यामुळे दंड देण्यात आला या प्रकरणी परिसरात माहिती मिळताच एकच खळबळ उडाली, त्यामुळे वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

याप्रकरणी बुलढाणा येथील पथकाने मोठी कारवाई करून मलकापूर महावितरण कार्यालय येथे दंड भरण्याकरिता दंड रक्कम भरणा करून घेण्यासाठी माहिती दिली आहे, मात्र डॉ. प्रशांत पाटील हे या दंडाची रक्कम भरणार की या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here