भुसावळ ः प्रतिनिधी
शहरातील रेल्वे हायस्कूल मागे असलेल्या रेल्वे फिल्टर हाऊस नजीक अनिल नगर (मूळ रा.पाळधी ता. धरणगाव) मधील रहिवासी लक्ष्मीबाई प्रल्हाद नन्नवरे(वय 78) यांचे आज सकाळी वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी 10 वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार असून त्या काँग्रेसचे कार्यकर्ते तथा न्हावी अनुराधा इंडियनचे संचालक शैलेंद्र नन्नवरे व भाजपचे कार्यकर्ते अनंतकुमार नन्नवरे यांच्या मातोश्री होत.