जळगाव ः येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष कृष्णकुमार वाणी व त्यांच्या कार्यकारिणीने जुलै-जुन 2022 या रोटरी वर्षात दर तीन महिन्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. क्लबच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित चौथ्या शिबिरासह एकूण 200 पेक्षा अधिक व्यक्तींनी त्यात रक्तदान करुन सहभाग घेतला.
गेल्या दीड-दोन वर्षातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन लांबलेल्या शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, अनलॉकनंतरचे वाढते अपघात, मे महिन्यातील सुट्ट्या, उन्हाळा यावेळी लागणारे रक्त उपलब्ध व्हावे म्हणून रोटरी वेस्टने रोटरॅक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्ट व जळगाव सायकलीस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या समवेत या शिबिरांचे आयोजन केल्याचे मेडिकल कमेटी चेअरमन डॉ. आनंद दशपूत्रे यांनी सांगितले.
रोटरी वेस्ट व रोटरॅक्ट वेस्टच्या सदस्यांसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, सायकलीस्ट असोसिएशनचे सदस्य यांच्या शिवाय सर्वसामान्य नागरिकांनी या शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवक-युवतींनी देखील प्रथमच रक्तदान करण्याचा अनुभव घेतला. सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आल्याचे प्रकल्प प्रमुख अमित चांदीवाल यांनी सांगितले. शिबीरांच्या यशस्वीतेसाठी आयोजक संस्थांच्या सर्व सदस्यांसह इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगावचे पदाधिकारी, अधिकारी व तंत्रज्ञ यांनी परिश्रम घेतले.



