सोयगाव : प्रतिनिधी
ब्बी हंगामातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या ई-पिक पाहणीसाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या,त्यामुळे रब्बीची ई –पिक पाहणी शेतकऱ्यांना मोबाईलवर करता आलेली नसल्याचे जमाबंदी आयुक्त पुणे यांच्या लक्षात आल्यावरून त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत या प्रक्रियेला दि.२८ फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ देण्य्ता आली आहे.त्यामुळे ग्रामीण स्तरावरील कृषी अधिकारी,मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी शेतकऱ्यांच्या हि बाब तातडीने लक्षात आणून द्यावी असे आदेशात म्हटले आहे.
रब्बी हंगामाच्या पिक पाहणी नोंदीसाठी ई-पिक पाहणीचे १.०,०.७ हे अपडेट व्हर्जन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे शेतकऱ्यांनी या नवीन अपडेट व्हर्जन वरून तातडीने स्वतःच्या मोबाईलवरून ई-पिक पाहणी करून घ्यावयाची आहे.या आधी खरीप हंगामासाठी कृषी आणि महसूल कर्मचाऱ्यांना या पिक पाहणीच्या कामांची जबाबदारी देण्यात आलेली होती परंतु यामध्ये अडचणी आल्याने शासनाने व्हर्जन अपडेट करून शेतकऱ्यांना आता मोबाईल वर च ई-पिक पाहणी करता येणार आहे.त्यामुळे संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांना याबबत मार्गदर्शक सूचना देवून वाढीव मुदतीत आपल्या तालुक्यातील रबीच्या हंगामातील ई-पिक पाहणी मोबाईल अप्सवर नोंदणी करून घ्यावी तसेच रब्बीच्या सर्व पिकांची नोंदणी होईल याबाबत यंत्रणांनी दक्षता घेण्याचे आदेश बजावण्यात आले आहे.