रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपतर्फे शिवजयंती साजरी

0
31

भुसावळ ः प्रतिनिधी: येथील जळगाव नाक्या जवळील सरदार वल्लभभाई पटेल पुतळा परिसरात रक्तदान श्रेष्ठदान ग्रुप तर्फे रक्तदान व रक्तगट नोंदणी शिबीर घेत शिवजयंती साजरी करण्यात आली.
रक्तदान व रक्तगट नोंदणी शिबीराचे उद्घाटन पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण  करण्यात आले.
या शिबीरामध्ये 29 पुरुष व 5 महिला असे एकुण 34 रक्तदाते यांनी रक्तदान केले. तसेच नवीन 114 रक्तदात्यांनी रक्तगट नोंदणी केली.  या ग्रुप जवळ एकुण 234 रक्तदात्यांची सुची आहे. भविष्यात ज्यांना रक्ताची गरज असेल त्यांनी 8857070444 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी आयोजिकांनी केले.  आजच्या काळात अतिशय  उपयुक्त आणि समाजाभिमुख कार्यक्रम राबविल्याचे  पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले.  शिबीराला परिसरातील सर्व आजी-माजी नगरसेवक, समाजसेवक यांना भेट दिली. शिबीराच्या यशस्वीतेसाठी ग्रुपचे अध्यक्ष राहुल सोनवणे, उपाध्यक्ष- भरत पाटील यांच्यासह  कार्यकर्त्यांनी परिश्रम घेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here