यावल : सुरेश पाटील
पोलीस स्टेशन पासून 500 मीटर अंतरावर असलेल्या व्यापारी संकुलनातील रेडिमेट कापड दुकानात चार-पाच जणांनी प्रवेश करून दुकान मालकास लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून जीवे ठार मारण्याची घटना आज गुरुवार दि.21एप्रिल रोजी13 ते13:30 वाजेच्या सुमारास घडल्याने केल्याने यावल शहरातील संपूर्ण व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली यामुळे यावल पोलीस स्टेशन हद्दीत आणि यावल शहरात पोलिसांचा धाक संपला असे बोलले जात आहे आणि अशी वस्तुस्थिती असताना सुद्धा यावल पोलिसात खांदेपालट होत नसल्याने आणि काही ठराविक पोलीस आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देत असल्याने त्याचे विपरीत परिणाम दैनंदिन कामकाजावर होत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुलनात परीधान कलेक्शन रेडिमेट दुकान आहे या दुकानातून एका ग्राहकाने आठ दहा दिवसापूर्वी रेडिमेट पॅन्ट विकत घेतली होती,ही रेडीमेट पॅन्ट तब्बल आठ दिवसानंतर परत करण्याच्या कारणावरून दुकान मालक आणि त्या एका ग्राहकांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला.त्यावेळेस ती व्यक्ती दुकानातून परत घरी जाऊन घरून चार-पाच मुलांना सोबत घेऊन तसेच एका हार्डवेअर दुकानातून लाकडी दांडे विकत घेऊन त्या लाकडी दांड्यासह रेडिमेट दुकानात प्रवेश करून दुकानातील सामानाची तोडफोड करून दुकान मालकास जबर मारहाण करून डोक्यात लाकडी दांडा मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला ही सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालेली आहे हा मोठा पुरावा आहे यात दुकान मालक राहुल मधुकर बडगुजर वय 22 याच्या डोक्यात जबर दुखापत झाली तर अक्षय मधुकर बडगुजर वय 20 यास सुद्धा लाकडी दांडा लागल्याने दुखापत झाली जखमीवर यावल ग्रामीण रुग्णालयात तातडीने औषध उपचार करण्यात आले पीएसआय पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पुढील कार्यवाही केली तसेच जखमींचे जाबजबाब घेऊन गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु केली.
यावल पोलीस स्टेशनला काही ठराविक माहितगार पोलिसांकडे सतत एकच कामकाज दिले असल्याने त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि ओळख परिचय झालेला आहे.त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने वरिष्ठ अधिकारी सुद्धा ते पोलिस सांगतील तीच पूर्व दिशा ग्राह्य धरून वस्तुस्थितीला प्राधान्य न देता सोयीनुसार निर्णय घेत आहेत.याचा विपरीत परिणाम पोलीस दलात सक्रिय कर्तव्यनिष्ठ पीएसआय आणि इतर पोलिसांवर पर्यायी जनतेवर होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील काही ठराविक पोलिसांची खांदेपालट करून दुसऱ्या पोलिसांना जबाबदारी दिल्यास कायदा-सुव्यवस्था, शांतता,जातीय सलोखा अबाधित राखला जाईल असे संपूर्ण यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात बोलले जात आहे.
यावल शहरात अजूनही बेशिस्त वाहतूक,बेशिस्त पार्किंग, अवैध प्रवासी वाहतूक, मालवाहतूक वाहने,बेकायदा प्रखर लाईट अडलेली वाहने,कर्कश आवाजाची हॉर्न लावलेली वाहने,वाहन क्रमांक नसलेली वाहने,नंबर प्लेट वर दुसरे चित्र असलेली वाहने, ताड़ीची बनावट दारू,पन्नीतील दारू,हाथभट्टीची दारू,गांजा पुड्या,छुप्या पद्धतीने सट्टा,पत्ता आजही सुरू आहे,भुसावल रस्त्यावर मिनीडोअर स्टॉप जवळ,एसटी स्टँड परिसरात आणि खुद्द यावल पोलीस स्टेशन समोर,यावल शहरात मेन रोडवर बेशिस्त वाहनांची वर्दळ,भर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी सुरू आहे, इत्यादी प्रकार संबंधित या काही पोलिसांना दिसून येत नसल्याने त्यांच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत पर्यायी गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांचा धाक आणि वचक राहिलेला नाही.
दुकानदाराला मारहाण झालेल्या प्रकरणात पोलीस स्टेशनला प्रमुख आरोपी ऐवजी दुसरे बनावट वयस्कर आरोपी हजर करण्यात आल्याचे सुद्धा दबक्या आवाजात बोलले जात असून या प्रकरणात यावल शहरातील संपूर्ण व्यापारी वर्गाच्या भवितव्याच्या दृष्टीकोणातून यावल पोलिसांनी या दरोडेखोर दादागिरी करणाऱ्यांविरुद्ध कड़क कारवाई करून भविष्यात पुन्हा अशी घटना होऊ नये याबाबत कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.