यावल तहसील आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाकावर टिच्चून वाटेल त्या ठिकाणी वीटभट्यांचे कारखाने.

0
11

यावल(सुरेश पाटील)

तहसील कार्यालयापासून काही अंतरावर तसेच तापी नदी किनाऱ्याल्या लागून आणि तालुक्यात ठिकठिकाणी तसेच काही ठिकाणी रस्त्याला लागून, बागायती शेत जमिनीवर,एन.ऐ. केलेल्या रहिवास जागांवर, वाटेल त्या ठिकाणी सोयीच्या जागेवर अनेक वीट भट्टी चालकांनी महसूल खात्याचे आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम वीट भट्टी टाकून आपले वीट भट्टीचे व्यवसाय, कारखाने सुरू केले आहेत.
यावल तालुक्यात काही वीट भट्टी चालकांनी महसूल खात्याच्या नियमानुसार वीटभट्ट्या सुरू केल्या आहेत. परंतु अनेक वीटभट्टी चालकांनी महसूल खात्याची तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रीतसर परवानगी न घेता सोयीनुसार वाटेल त्या ठिकाणी मर्जीनुसार वीटभट्टया कारखाने सुरू केले आहेत,भुसावळ येथे तापी नदी पुलाजवळ रहिवासासाठी प्लॉट पाडलेल्या प्लॉट जागेवर वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला आहे.या जागा मालकाने प्लाटीचा वापर भाडे तत्त्वाने व्यवसायिक दृष्ट्या केल्याने जागा मालकाकडून व्यवसाय कर का वसूल करू नये? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,याच प्रमाणे तालुक्यात प्रमुख रस्त्यांच्या आजूबाजूला बागायती शेतजमिनीवर वीटभट्ट्या सुरू आहेत यामुळे पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम झाला असून महसूल व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी देताना ज्या अटी-शर्ती दिलेल्या आहेत त्याचे पालन केले जात आहे किंवा नाही याबाबत फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग साहेब यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मंडळ अधिकारी तलाठी यांच्या माध्यमातून वीट भट्याचे प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन स्थळ पंचनामे करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश जगन्नाथ पाटील यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here