यावल ः प्रतिनिधी
येथील तहसील कार्यालयात आज साडेबारा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच स्वीकारतांना एका नायब तहसीलदारास रंगेहात पकडल्याचे वृत्त आहे.लाच स्वीकारताना पकडण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे.मुक्तार फकिरा तडवी असे या नायब तहसिलदाराचे नाव आहे.
यावल तहसीलदार कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिले नसल्याने सर्रासपणे टेबलवर पैसे घेतले जात असल्याची सुद्धा जोरदार चर्चा तालुक्यात आहे नाशिक जवळील सप्तशृंगी देवीच्या परिसरात लाखो रुपये खर्चून एका महसूल अधिकाऱ्याकडून भव्य दिव्य बांधकाम सुरु असल्याचेसुद्धा जळगाव जिल्ह्यात महसूल कार्यक्षेत्रात व राजकारणात बोलले जात आहे.बदली करून आणणाऱ्या लोकप्रतिनिधीचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने मतदार संघात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यावल तालुक्यात एक प्रमुख अधिकारीसुद्धा सर्रासपणे आपल्या केबिनमध्ये पैसे घेत असल्याचे बोलले जात असले तरी त्याचा विपरीत परिणाम म्हणून एक नायब तहसीलदार आज पैसे घेताना पकडला गेला.त्यासह तालुक्यातील महसूल संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी विभागीय स्तरावरून झाल्यास अनेक प्रकरणे उजेडात येतील यासाठी कार्यवाही व्हायला पाहिजे, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.या प्रकरणी लाचलुचपत विभागामार्फत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
–—