मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील यक्तीचे रुग्णवाहिका चालकाने दागिने केले परत

0
37

नाशिक  प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 108 रुग्णवाहिका ( 108 Ambulance ) चालकाने एका मृतासह एका जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेत रुग्णालयात दाखल केले होते, सदर रुग्णाचे पडलेले दागिने रुग्णवाहिका चालकाने पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की (दि.२ ) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर हॉटेल सयाजी पॅलेस समोर स्विफ्टकार व ट्रक मध्ये जोराची धडक होऊन मोठा अपघात झाल्याने आडगाव नाका पंचवटी येथे 108 रुग्णवाहिकेवर कर्तव्यावर असलेले डॉ. दानिश शहा, व चालक नारायण जेजुरकर यांनी जखमी व्यक्तीला औषधोपचारासाठी आडगाव नाका येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते व मयताला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

 

दरम्यान (दि. 9) रुग्णवाहिका चालक नारायण सुरेश जेजुरकर (रा.चुंचाळे शिवार, दत्त नगर, अंबड, नाशिक ) ( Ambulance Driver Narayan Jejurkar ) हे रुग्णवाहिकेची सफाई करत असताना त्यांना कचरापेटीत एक छोटी हॅन्ड पर्स मिळाली त्यामध्ये सुमारे 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, 20 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत,2 मोबाईल, रोख रक्कम असा 85 हजार 62 रुपयाचा ऐवज मिळून आला. त्यांनी ही माहिती मालेगाव स्टँड पोलीस चौकीचे बीट मार्शल संदीप बाविस्कर यांना सांगितल्याने त्यांनी जेजुरकर यांना पंचवटी पोलीस ठाण्यात आणून सदर हॅन्ड पर्स जमा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here