Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»मिनी दाल मिल, फवारणीसाठी ड्रोन, इलेक्ट्रिक बैल ठरतोय आकर्षण
    कृषी

    मिनी दाल मिल, फवारणीसाठी ड्रोन, इलेक्ट्रिक बैल ठरतोय आकर्षण

    SaimatBy SaimatNovember 5, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    शहरातील एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर सुरू असलेल्या अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनास पहिल्या तीनच दिवसात हजारो शेतकर्‍यांनी भेटी दिल्या. यात प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यासह धुळे, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, बर्‍हाणपूर आदी जिल्ह्यातून शेतकरी आले होते. दरम्यान, प्रदर्शनाचा आज समारोप होणार असल्याने शेतकर्‍यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाने उपयुक्त ठरणार्‍या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनात प्रक्रीया उद्योगासाठी मिनी दाल मिल, फवारणीसाठीचे ड्रोन, मजूर समस्येला पर्यायी इलेक्ट्रिक बुल, मिल्कींग मशीन, प्राण्यांपासून पिकांचे सरंक्षण करणारे झटका मशीन यासांरखे वैशिष्ठ्यपूर्ण व अत्याधुनिक कृषी उपकरणांचे स्टॉल उपलब्ध आहेत.

    शेतकर्‍यांनी नेहमी आशावादी राहीले पाहीजे. जगात सर्व मिळू शकते, परंतु आशा कुठेच मिळत नाही. कोणाकडून काय ज्ञान घेता येईल, यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. सध्याच्या काळात शेतकर्‍यांना सर्वाधिक गरज आहे ती, ध्यान, समयसूचकता आणि दिशादर्शकाची. आणि हे दिशा देण्याचे काम अ‍ॅग्रोवर्ल्ड करीत आहे, असे प्रतिपादन जळगाव कृषी विभागाचे सेवानिवृत्त कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी अ‍ॅग्रोवर्ल्ड पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले. राईज न् शाईनचे अमेय पाटील, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, मेट्रोजेनचे संचालक प्रियंक शहा, ऋचा शहा, प्लॅन्टो कृषी तंत्रचे निखील चौधरी, अ‍ॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण आदी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

    उल्लेखनीय कार्य करणार्‍या शेतकर्‍यांचा केला सन्मान

    प्रदर्शनात रविवारी शेतकरी, शेतकरी गट, जोडव्यावसायिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी पुरस्काराने मनोज वायकोळे, भारती पाटील, सुनिता पाटील, राजश्री वानखेडे, सुरेश पाटील, सागर पाटील, नारायण सोनवणे, मयुरी पाटील, शंकर पाटील, अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श गट शेती पुरस्काराने झाशीची राणी स्वयंसहायता महिला बचत गट, भूजल अभियान, रेणुका माता महिला शेतकरी गट, बळीराजा महिला शेतकरी गट, गुरुमाऊली महिला शेतकरी गट, राजे शेतकरी गट, श्री संत गजानन महाराज कापूस उत्पादक गट, अ‍ॅग्रोवर्ल्ड आदर्श जोड व्यवसाय पुरस्काराने गोपाल सपकाळे, समर्पित वाघ, राजेंद्र पाटील, समाधान पाटील यांचा तर अ‍ॅग्रोवर्ल्ड जलदूत पुरस्काराने सुनिल पाटील आणि तृषाल तायवाडे आदींचा सत्कार करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Pachora:पाचोरा बायपासवर भरधाव ट्रक पलटला

    March 19, 2026

    Jalgaon:जळगाव भगवेमय हिंदू नववर्ष स्वागत यात्रा भक्तिपूर्ण रंगात रंगली

    March 19, 2026

    Jalgaon Murder : जळगावात कौटुंबिक वादाचा अंतःस्थळ: पत्नीची लोखंडी विळ्याने निर्घृण हत्या

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.