नाशिक : यास्मिन शेख
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर महाशिवरात्रीनिमित्त प्राचीन हेमाडपंती शिवमंदिरात महाभंडाराचे आयोजन संपन्न झाले सालाबाद प्रमाणे 2007 पासून ते आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षांपासून दुबे परिवाराने महाशिवरात्रीनिमित्त शिव रुद्राभिषेक व महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते व ही परंपरा दुबे परिवाराने अखंड सुरू ठेवली आहे.
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरचा शिवालय तलावा शेजारी असलेल्या प्राचीन हेमाडपंती मंदिरात गावकरी व दुबे परिवार यांनी महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या भंडाऱ्याला हजारो भाविक व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळेस दुबे परिवार यांनी व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनमोल सहकार्य करून याचे नियोजन केले होते यावेळेस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री अजय दुबे, कांचना दुबे, संगीता दुबे, ग्रामपंचायत सदस्य राजू गवळी, मनोहर कदम, संतोष तिवारी, अशोक खांडेकर, मोंटी दुबे, योगेश कदम सह अनेक शिवभक्त व पत्रकार बांधव उपस्थित होते.