भुजल अभियानांतर्गत ‘एक गाव एक तलाव’ संकल्पनेतून कळमडु येथे उपक्रम

0
26

चाळीसगाव ः प्रतिनिधी

तालुक्यातील कळमडु येथे सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प अंतर्गत भूजल अभियानात तलावाच्या कामाला शेतकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गावकरी, भजनी मंडळ व पारंपरिक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या तलावामुळे 100 ते 150 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

या तलावाच्या नावाबद्दल जुने जाणते लोक सांगतात की, कळमडूचे राजधर बुवा तलाव हे नाव कशावरून पडले. फार जुन्याकाळी कळमडूचे वाणी समाजाचे बाबा गावातून पायी चालत आले होते. आधी हा जंगल फार घनदाट होता म्हणजे एवढं दाट होता की, जवळचा माणूस दिसायचे नाही त्यावेळी राजधर बुवा या जंगलात आले आणि मरेपर्यंत इथंच राहिले तर त्या ठिकाणी त्यांचा आज पण छोटासा ओटा बांधलेला आहे.

या तलावासाठी श्रम करणारे गावातील भुजल दिंडी प्रमुख व भुजल वारकरी आणि भुजल अभियान टीम फार मेहनत घेत आहेत.या वेळी उपस्थित ग्रा.पं.सदस्य दयाराम पाटील,शाम पाटील,अमोल पाटील,करमाड येथील पोलीस पाटील दीपक पाटील,ज्ञानेश्वर पाटील,कोमल चौधरी,दीपक पाटील,भागवत पाटील व भजनी मंडळ व भुजल टीमचे सहकारी योगेश राठोड,पंकज राठोड,प्रवीण राठोड,निखिल राठोड, तसेच सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शेतकरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here