साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या अटकेतील संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मुक्ताईनगर येथे मनसेतर्फे पोलीस स्टेशन मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई, शहराध्यक्ष मंगेश कोळी, उचंदे गण अध्यक्ष गजानन पाटील, प्रहारचे दिव्यांग क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष उत्तम जुबळे, दीपक पाटील, कल्पेश पाटील, रोशन पाटील आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थिती होते. सदर निवेदन मुक्ताईनगर पोलीस स्थानकात देऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.