जळगाव : प्रतिनिधी
बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्ह्यातील सात महिन्यांपासून फरार संशयित महिलेस पोलिसांनी कांचननगर, जैनाबाद परिसरातून अटक केली आहे. सपना सागर पाटील असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बाललैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित महिला सपना पाटील हिच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात १० डिसेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार होती. पथकातील उपनिरीक्षक दीपक जगदाडे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, दत्तात्रय बडगुजर, विकास सातदिवे, गणेश शीरसाळे, योगेश बारी, छगन तायडे अशांच्या पथकाने बातमीची खात्रीकरुन अलगदपणे धडक देत जैनाबादेतून संशयित सपना पाटील हिला ताब्यात घेतले आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे