साईमत, जळगाव ः प्रतिनिधी
शहरातील गणेश कॉलॉनी परिसरात बांधकामाच्या कामावर काम करणाऱ्या मजुराचा दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी घडली.
तालुक्यातील ममुराबाद येथे रहिम कासम पिंजारी (वय-५२) हे वास्तव्याला होते. ते सेंट्रींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत. गणेश कॉलॉनी परिसरात ते सेंट्रींग काम करत होते. शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी काम करत असतांना त्यांचा तोल गेल्याने ते दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी रुखसाना आणि जुबेर व तौसीफ हे दोन मुले असा परिवार आहे.