फुकट्या रेल्व्ो प्रवाशांविरुध्द धडक कारवाई

0
10

जळगाव ः प्रतिनिधी

आरपीएफ व वाणिज्य विभागाच्या संयुक्त पथकाने विविध स्थानकांवर शनिवारी अचानक तिकीट तपासणी केली. या मोहिमेत 180 तिकीट तपासणीस, 140 रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी 46 रेल्वे गाड्या व जंक्शनवर तपासणी केली. त्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 6 हजार 506 प्रवाशांकडून 37 लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

रेल्वेतून अनेक फुकटे प्रवासी प्रवास करत असल्याने त्याचा परिणाम रेल्वेच्या तिकीट खिडकीवर होत आहे. यामुळे डीआरएम एस. एस. केडिया यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे, आरपीएफ आयुक्त क्षितिज गुरव यांनी शनिवारी सकाळी 6 वाजेपासून विविध रेल्वे स्थानकांत 30 पथकांद्वारे 46 गाड्यांमध्ये 37 लाखांचा दंड वसूल केला.या मोहिमेमुळे फुकट प्रवास करणाऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here