जळगाव ः प्रतिनिधी
इंदौर येथील प. पू. नाना महाराज तराणेकर यांचे जीवनदर्शन घडविणारी संजीव कुसूरकर लिखित मालिका गेल्यावर्षी सायंदैनिक …साईमत…ने महिनाभर प्रकाशित केली.त्यावर आधारित ॥ मार्तंड जे तापहीन॥ या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात आयकर अपील न्यायाधिकरणाचे सदस्य इंटुरी रामा राव यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी त्रिपदी परिवाराचे अर्ध्वयु हरी मुस्तीकर, विश्वस्त ॲड. शिवराज कदम,संजीव कुसूरकर,श्री. जहागिरदार आदी.