पाचोऱ्यात शासकीय जागा हडप करण्यासाठी कागदपत्रांची रंगरंगोटी ..

0
19

पाचोरा ( प्रतिनिधी )

पाचोऱ्यात शासकीय जागा हडप करण्यासाठी कागदपत्रांची रंगरंगोटी झाल्याची खळबळ माजली आहे नगरपालिका इमारतीच्या लाईनवर शासनाची कोट्यवधीची जागा फुकट हडप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याआदी हायपॉवर वापरून बड्या नेत्या सोबत लबाडी करून विविध स्वरूपात शासकीय जागा हडप.झाल्या आहे .? यात काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी व नगरपालिका प्रशासनाला हाताशी धरत शासकीय जमिनी हडप करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रकार घडत आहे.

नुकतच ऐका राजकीय पदाधिकारीने पाचोरा नगरपालिका हद्दीत मुख रस्त्यावरची कोट्यवधीची जागा हडप करण्यासाठी बड्या नेत्यांना हाताशी घेऊन कागदपत्रे रंगविले असल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शासनाने शहराचा विकास आराखडा (डीपी) तयार करताना विविध ठिकाणी असलेल्या गुंठेवारीच्या जमिनींवर आरक्षणाची तरतूद केली.

आहे मात्र शहरातील बहुतांश गुंठेवारी जमिनींची स्थानिक राजकारण्यांनी कमी किमतीत खरेदी केली आहे. मात्र आता कडक कायदे लागू केले असून जमिनींचे प्रस्ताव मंजूर होत नसल्यामुळे गुंठेवारी प्लॉटची खरेदी करणाऱ्या मालमत्ताधारकांसह भूखंडांची विक्री करणारे भूमाफिया अडचणीत सापडले आहेत. या मुळे पाचोरा शहरातील अशा स्थितीत काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला हाताशी धरून जागा हडप करण्यासाठी कागदपत्रे रंगवून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर येत आहे. तो राजकीय पदाधिकारी कोण कोणत्या पक्षाचा आहे अशी चर्चा सुरू आहे.

त्यांनी पाचोरा शहरातील मुख्य रस्त्यावर गाळा बांधण्यासाठी शासनाची कोट्यवधीची जागा फुकट हडप करण्याकरता आजी माजी आमदारांना हाताशी धरून कागदपत्रे रंगविले जात आहे.नगरपालिका प्रशासनाने ही जागा दिली आहे किंवा नाही या बाबत सत्य माहिती साठी माहितीचा अधिकार अर्ज नगरपालिकेत दाखल केला असून नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही माहिती अजून पर्यत मिळाली नाही मात्र अर्ज दाखल झाल्यानंतर हडप होत असलेल्या जागेवरच चर्चा जोरदार सुरू आल्या झाल्या आहे.

माहितीच्या अधिकारात नगरपालिका प्रशासन मागितलेली माहिती पूर्ण कधीच देत नाही अर्जावर नमूद केलेल्या विषयावर विविध तरदूत ठेवून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असतात या मुळे नगरपालिका विभागातुन कागदपत्रे रंगवून शासकीय जागा हळप होत असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here