पाचोरा : प्रतिनिधी
पाचोरा शहरात अनेक प्रभागात निवडणुकीच्या तोंडावर विकासाच्या नावाखाली रस्त्याचे कामात कोट्यवधीचा मलिदा लाटण्याने काम सुरू आहे.कारण होत असलेले रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात आहे.या कामाकडे नगरपालिका बांधकाम अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे.शहरात अश्या अनेक कामा मध्ये बोगस मटेरियल वापरून विकास कामे केले जात आहे. सर्व सामान्य जनतेच्या करातून शासनाकडे कोट्यवधी रुपये जमा होत असतो.आणि याचं निधीतून विकास कामासाठी कोट्यवधी खर्च केला जातो. सत्ताधारी व कुंभकर्णी अधिकारी शासकीय खुर्ची वर बसून ठेकेदाराशी साटेलोटे करून होत असलेल्या कोट्यवधीच्या विकास कामाकडे दुर्लक्ष करतात. पाचोरा शहरात होत सुरू असलेल्या सदर बांधकाम बंद करुन कामाची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे, तरच त्याचे बिले मंजूर करावे अशी मागणी पाचोरा शहरातील नागरिकांनतर्फे चर्चेत बोलले जात आहे.
या साठी वरिष्ठांकडे निवेदनातून चौकशीची मागणी केली पाहिजे. असेही बोलले जात आहे.सविस्तर वृत्त असे की पाचोरा नगरपालिका मार्फत शहरात विविध योजनेंतर्गत सिमेंटचे रस्ते करणाचे काम सध्या सुरू आहे. तर गेल्या महिन्या पूर्वी पाचोरा नगरपालिकाचे लोकनियुक्त मा नगराध्यक्ष संजय गोहिल यांच्या घराजवळ सिमेंट रस्त्याचे काम झाले आहे. मात्र त्याच्या घराजवळ रस्ताच्या कामाचे पितळ उघळे पडले झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या वरून लक्षात येते की नवीन तयार झालेले रस्ते किती निरकृष्ठ बनविण्यात आले आहे हे स्पष्ट दिसतंय शहरात सुरू असलेले रस्त्याचे काम नगरपालिका मुख्याधिकारी व बांधकाम विभागातील अधिकारी आणि इंजिनिअर यांनी टक्केवारी घेऊन सत्ताधारी यांच्या मर्जीतील ठेकेदाराला दिले असल्याचे त्या कामाची कुठलीही चौकशी होत नाही,कारण.या ठेकेदाराने सर्व अधिकाऱयांना पाकीट देऊन गप्प केले असल्याचे बोलले जात आहे.
वास्तविक नियमानुसार कोणतेही शासकीय काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारामार्फत ५ वर्षापर्यंत देखभाल व दुरुस्तीची हमी घेण्यात येत असते मात्र पाचोरा शहरात सुरू असलेल्या सिमेंटच्या रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदारान कडून अशी हमी पाचोरा नगरपालिका मधील मुख्याधिकारी व बांधकाम अधिकारी यांनी घेतली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे,या बांधकामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट व बोगस मटेरियलचा वापर करण्यात आल्याचा आरोपही पाचोरेकर करत आहे. यासंबंधी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली असेलच. शहरात सध्या चांगल्या मजबूत रस्त्यावरही कॉक्रेटिकरन रस्ता हा घरात करतो तसा कोब्याचा थर देणे सुरु आहे.
या बाबत नगरपालिका मधील प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार काम होत आहे किंवा नाही. असे प्रत्यक्ष काम पाहिल्यानंतर लक्षात येते, यासाठी पाचोरा शहरात शिवसेना राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपचे पदाधिकारी,व नगरसेवक यांनी प्रत्यक्ष सदर कामाला भेट देऊन निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची माहिती घ्यावी अशी अपेक्षा आहे.
गरज असलेल्या रस्त्यांचा विकास करणे सोडून पक्के असलेले रस्त्यांवर थातूरमातूर काम करून आपला विकास साधण्याचे काम अधिकारी व कंत्राटदार करीत असल्याचेही बोलत आहेत.या काम बाबत मुख्याधिकारी व बांधकाम विभागातील अधिकारी यांनी विकास कामाची तपासणी करून ठेकेदारावर भ्रष्ट्राचाराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.