पाचोरा भडगावातील मातोश्री शेत पाणंद रस्ते कामे त्वरित सुरू करा. आ.किशोर अप्पा पाटील यांचे आढावा बैठकित आदेश

0
41
पाचोरा प्रतिनिधी 
महाराष्ट्र शासनाच्या मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते व विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेच्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना त्वरित रस्ते काम सुरू करण्याचे निर्देश आ.किशोर अप्पा पाटील यांनी दिल्याने आगामी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांचा त्रास काहीसा कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे चित्र निर्माण झोले आहे.सोमवारी दुपारी २ वाजता शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात आ.पाटील यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत त्यांना विविध सूचना करत मार्गदर्शन केले.
 पाचोरा व भडगाव तालुक्यात मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते अंतर्गत सुमारे ९१ रस्ते मंजूर झाले असून यात  पाचोरा तालुक्यात ५७ तर भडगाव तालुक्यातील सुमारे ३४ रस्त्यांचा समावेश असून लवकरच आणखी काही रस्त्यांना मंजुरी मिळणार असल्याने ही कामे तातडीने पूर्ण करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी बैठकीत ठरवण्यात आले.या योजने अंतर्गत प्रत्यकी १ किलोमीटर रस्ता केला जाणार असून यासाठी सुमारे २४ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
बैठकीला पाचोरा तहसीलदार कैलास चावडे, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, पाचोरा गटविकास अधिकारी अतुल पाटील, भडगाव गटविकास अधिकारी …वाघ , बांधकाम विभागाचे मुख्य सहाय्यक अभियंता डी एम पाटील, शेलार ,काजवे, तसेच पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे अभियंते, विस्तार अधिकारी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here