पहुर ता.जामनेर : प्रतिनिधी
येथील आर.टी.लेले विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी कागदी पुठ्या पासून बनवलेले जेसीबी आणि ट्रॅक्टर ट्रॉली प्रोजेक्टचे प्रदर्शन करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला. दरम्यान , राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम देखील साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे व्हा. चेअरमन साहेबराव देशमुख, प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, शिवसेना प्रवक्ते तथा पत्रकार गणेश पांढरे, सहकार महर्षी अरुण घोलप पत्रकार, प्रवीण कुमावत, यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राजधर पांढरे गणेश पांढरे, मुख्याध्यापक आर बी पाटील, प्रमुख मार्गदर्शक संभाजी पाटील, पर्यवेक्षक एस व्ही पाटील आदी मान्यवरांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. त्याच बरोबर प्रमुख मार्गदर्शकांनी आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक व इतर शिक्षकांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमांत इयत्ता दहावी आणि बारावीच्या एकूण १७० विद्यार्थ्यांनी निरोप घेतला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांना भेटवस्तू देऊन निरोप समारंभाचा कार्यक्रम केला. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आर.टी.लेले विद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये शिकत असणाऱ्या देवेंद्र नितीन घोटकर या विद्यार्थ्याने स्वतःच्या हाताने कागदी पुठ्या पासून बनविलेल्या जेसीबी आणि ट्रॅक्टर, ट्रॉली व इतर वस्तूंचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.टी.देशमुख यांनी केले. तर आभार एम.एस.अगारे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.बी.पाटील पर्यवेक्षक एस.व्ही.पाटील व विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी, पत्रकार, तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.