मुंबई |
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.
मंदिर प्रशासनाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी ते वारकऱ्यांशीही संवाद साधतील.
देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान मुंबईसाठी रवाना होतील. मुंबईतील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करणार आहे. संध्याकाळी ६ च्या सुमाराला पंतप्रधान मोदी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहे.
तसेच नवीन जलभूषण इमारत आणि क्रांतिगाथा या क्रांतिकारकांच्या दालनाचा उदघाटन सोहळा राजभवन इथं पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजर राहणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहे.