नंदुरबार: प्रतिनिधी
रशिया आणि युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून युक्रेनमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील जे नागरीक व विद्यार्थी अडकले असतील त्यांच्या नातेवाईकांनी जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. त्यानुसार अद्यापर्यंत युक्रेनमध्ये असणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला आहे.



