फैजपूर: प्रतिनिधी
येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर कळमोदा येथे संपन्न झाले. सदरील शिबीरात विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीकोणातून रोज सकाळी योग आणि प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात आले. योग आणि प्राणायाम प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे हे उपस्थितीत होते. डॉ. मारतळे यांनी योग यांचे प्रात्यक्षिक व त्या आसनाचे महत्त्व सांगितले.
त्या सोबत प्राणायाम व त्यांचे प्रशिक्षक आणि त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. डॉ. मारतळे यांनी आधुनीक युगात मनुष्याची बदलेली जीवनशैली व त्यातून निर्माण झालेले विकार या बद्दल मार्गदर्शन केले. शरीरातील निर्माण झालेले विकार यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी योग व प्राणायाम हे उत्तम साधन आहे. मनुष्याने योग व प्राणायाम या साधनांचा जीवन जगत असतांना जर अंगीकार केला तर व्यक्ती निरोगी जीवन जगू शकतो असे सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी योग व प्राणायाम यांचा अंगीकार आपल्या जीवनात करावा असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरीसर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दिपक सुर्यवंशी, प्रा. शेरसिंग पाडवी, प्रा. डॉ. सरला तडवी यांचे प्रशिक्षण देण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.