जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या तरसोद येथील मराठी शाळेत निवृत्त शिक्षक विजय लुल्हे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. वडील स्वर्गीय मुख्याध्यापक सुपडू सुतार यांच्या स्मरणार्थ त्यांनी हा उपक्रम राबवला. शशिकांत हिंगोणेकर अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे निरीक्षक तथा विस्तार अधिकारी सुनिल जोशी (सांख्यकीय विभाग ) व अभियंता योगेश पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर सोनवणे, आदर्श केंद्रप्रमुख भगवान देवरे, भास्कर पाटील, तुकाराम पाटील, प्रभारी मुख्याध्यापिका सुषमा पाटील, आत्माराम सावकारे उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय लुल्हे व मनोहर बाविस्कर यांनी केले. कार्यक्रमाची प्रेरणा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील आदींकडून मिळाली होती.