जळगाव : प्रतिनिधी
प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने निविष्ठांची कार्यक्षमता 80 ते 90 टक्के मिळेल. त्यामुळे उत्पादनात अधिक वाढ होते. पाण्याची टंचाई, विजेची टंचाई, मजुरांची उलब्धता, खतांची टंचाई या समस्यांवर उपाय ठिबक सिंचन तंत्रज्ञान हाच उपाय असून शेतकऱ्यांच्या समृद्धीचा ठिबक सिंचन तंत्र राजमार्ग आहे असे मत जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे यांनी व्यक्त केले.
कोळपिंप्री येथे व्ही. एम. पाटील यांच्या मोसंबी, आंबा, केळी, गहू, हरभरा पिके असलेल्या शेतांमध्ये शेतकरी मेळावा आयोजित केला होता. डॉ.बी.डी.जडे यांनी कापूस आणि मका लागवडीच्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी भरत वारे, जैन
इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक दिलीप बऱ्हाटे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी रोहिदास पाटील, पंचायत समितीचे उपसभापती अशोक पाटील, शिवाजी पाटील, गणेश पाटील उपस्थित होते.