फैजपूर l प्रतिनिधी
गजानना हॉस्पिटल फैजपूर मध्यरात्री १२ वाजता केले रक्तदान फैजपूर येथील गजानन प्रसुतीगृह हॉस्पिटलमध्ये मोठा वाघोदा येथील माहेर वाशीण महिलेस प्रसुतीसाठी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्रीची बारा वाजेची वेळ होती, आणि पेशंट अशक्त असल्यामुळे चार बॅग रक्त पाऊच ची आवश्यकता होती. ती डॉक्टरांनी उपलब्ध करण्यासाठी पेशंटच्या वडील नातेवाईक यांना सांगितले. मात्र मध्यरात्रीचे १२ वाजेची वेळ असल्याने काय करावं तेच उमजेना.

अशी अवस्था समोर होती. त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये उपस्थित मोठा वाघोदा येथील प्रगतिशील शेतकरी कुंदन काशिनाथ (गोटू सेंड) यांनी मोठा वाघोदा ग्रामपंचायत चे सरपंच मुबारक (राजू)अलिखा तडवी यांच्या भ्रमणध्वनीवरून कळवली सरपंच यांनी लगेच १२:०५ ला फैजपूर येथील रुग्णसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष रशीद बाबू तडवी व संजय तडवी यांना पेशंटला रक्ताची गरज भासत असल्याचे सांगितले. या दोघ निस्वार्थ तडवी भिल समाजसेवकांनी क्षणभरही विलंब न करता मित्रांसह तात्काळ दवाखान्यात दाखल झाले आणि स्वतः रक्तदान केले. महिलेची सुखरूप प्रसुती होऊन तिला पुनर्जीवन मिळाले. फैजपूर शहरातील तडवी फैजपूर रुग्णसेवक गृपच्या या जागतिक रक्तदान दिनी रशिद तडवी, संजय तडवी व मित्र यांनी जागतिक रक्तदान दिनी रक्तदान करीत समाज मनात एक नविन आदर्श घडवला. त्यांच्या या निस्वार्थी रुग्णसेवेबद्दल सर्व समाजात त्यांचे आभार व कौतुक केले जात आहे.
Attachments area