जळगावःप्रतिनिधी
येथे दि.11 मार्च पासुन ॲग्रोवर्ल्ड कृषिप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शिवतीर्थ मैदानावर दि.11 ते 14 मार्च दरम्यान हे कृषिप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
कृषी विस्तारात सहा वर्षांपासुन प्रभावी ठरलेल्या ॲग्रोवर्ल्ड जी.एस.ग्राऊंडवर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.कृषी प्रदर्शन मोफत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ॲग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे. चार एकरच्या परिसरात 220 पेक्षा अधिक स्टॉल्स असणार आहेत. यंत्र व अवजारांचे स्वतंत्र दालन, सर्व शासकीय विभाग, बँके, प्राजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती मिळेल, जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड य प्रदर्शनाचे प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, ऱ्हायनोमॅट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई मोटर्स प्रायव्हेट लिमीटेड व गोदावरी फाऊंडेशनचे हृद्यालय हे सहप्रायोजक आहेत. प्रदर्शनस्थळी भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची गोदवरी फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यात नाक, कान,घसा, डोळे, हृद्यरोग व रक्त तपासणीसह विविध आजारांची तपासणी केली जाणार आहे. याच बरोबर टुडी इको याची देखिल दोन दिवस तपासणी केली जाणार आहे.