जळगाव ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तसेच युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे 15 जून 2022 रोजी अयोध्या दौऱ्यावर असून अयोध्या येथे रामलल्ला, हनुमान गढी, इस्कॉन टेम्पल या ठिकाणी दर्शन घेणार आहेत व सायंकाळी शरयू नदीच्या घाटावर शिवसैनिक व युवासैनिकांच्या उपस्थितीत भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील युवासैनिक, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, युवासेना विभागीय सचिव अविष्कार भुसे, युवासेना सहसचिव विराज कावडीया, विस्तारक कुणाल दराडे, विस्तारक किशोर भोसले यांच्या नेतृत्वात रावेर लोकसभेतील युवासेना जिल्हा अधिकारी चंद्रकांत शर्मा, पवन सोनवणे, विष्णू इंगळे, प्रविण पंडीत, राकेश घोरपडे, ॲड.भरत पवार, मोहन जोशी यासह जळगाव लोकसभेतील शिवराज पाटील, राकेश चौधरी, निलेश वाघ, जितेंद्र जैन, संदिप राजे, सागर पाटील,श्रीकांत पाटील,अमित जगताप, शंतनू नारखेडे, आयुष कस्तूरे, ओंकार कापसे, गणेश भोई, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण,पवन चव्हाण, संदीप सुर्यवंशी आदी अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. अयोध्या येथील नियोजनाच्या समितीत जळगाव येथील युवासेना सहसचिव विराज कावडीया यांचा सक्रिय सहभाग आहे.