जळगाव ः प्रतिनिधी
जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त शाखा अभियंता हिरामण हरीभाऊ चव्हाण यांनी काल शिरसोली रस्त्यावरील गरीब वस्तीत 30 गरजू मुलांना चप्पल व बुटांचे वाटप केले.
जळगाव शहराचे तापमान अधिक असून, काही दिवसांपूर्वी हिरामण चव्हाण यांनी गरीब मुलांना भर उन्हात अनवाणी पायाने फिरताना पाहिले.त्याचवेळी त्यांनी या गरिबांना मदतीचा हात देण्याचा निश्चय केला. त्यानुसार मंगळवारी चप्पल व बुटाचे गरीब मुलांना वाटप केले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पहाण्यासारखा होता.