जळगाव ः प्रतिनिधी
चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे रविवारी डॉ. मिलिंद वायकोळे यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिराचा 45 सभासदांनी लाभ घेतला. डॉ. मिलिंद वायकोळे, डॉ. रूपाली वायकोळे यांनी सभासदांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले.
शिबिरात तपासणी केल्यानंतर ज्येष्ठांना निष्पन्न झालेल्या आजारांबाबत चाचणी करून औषधोपचाराचे आवाहन करण्यात आले. चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पंडितराव सोनार, उपाध्यक्ष ॲड अरुण धांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सचिव विकास बोरोले व सदस्यांनी नियोजन केले. ॲड अरुण धांडे यांनी आभार मानले.