Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»धरणगाव»चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धरणगावला मूक मोर्चा
    धरणगाव

    चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धरणगावला मूक मोर्चा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 8, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

    भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा करावी, या मागणीसाठी धरणगाव शहरातील सर्वपक्षियांतर्फे मंगळवारी, ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मूक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बजरंग चौक, मराठे गल्ली मार्गे निघून धरणगाव तहसील कार्यालयासमोर धडकला. मूक मोर्चात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी धरणगाव तालुका प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

    भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठ वर्षीय चिमुकलीवर गावात राहणारा स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय १९) याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दगडाने मारून तिला कडबा कट्टीत झाकुन ठेवले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर संशयित आरोपी स्वप्निल पाटील याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. दरम्यान, संशयितावर जलद गतीने न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा करावी, पीडित कुटुंबाला शासनाकडून न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी मूक मोर्चा काढण्यात आला.

    प्रमुख मार्गावरुन निघाला मोर्चा
    मोर्चात शहरातील विविध संघटना, सर्वपक्षीय नेते, शाळेतील विद्यार्थिनी, विद्यार्थी यांच्यासह महिला, पुरूष सहभागी झाले होते. मूक मोर्चाला बजरंग चौक येथून सुरूवात करण्यात आली. त्यानंतर मराठे गल्ली, धरणी चौक, कोट बाजार, तहसील कार्यालयावर नेण्यात आला. अटकेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी, अश्ाा मागणीचे निवेदन तालुका प्रशासनाला देण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026

    Dharangaon : शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश

    January 31, 2026

    Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेतील बोगस दिव्यांग प्रकरण : दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

    January 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.