चिनावल गावात पुन्हा शेतकऱ्याचे 1000 केळीचे घड टाकले कापून 

0
29

सावदा ता रावेर : प्रतिनीधी
शेतमाल चोरी अटकाव केल्याने शेतकऱ्याला मारहाण व नुकसानीची घटना ताजी असतानाjच पुन्हा चीनावला शेतकऱ्याचे एक हजार केळीचे घड कापून फेकण्यात आले आहेत. परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी भयभीत होऊन संरक्षणाची मागणी करू लागले आहे. चीनवल येथील कमलाकर भारंबे, निखिल भारंबे, अरविंद भास्कर महाजन, होमकांत महाजन यांच्या शेतातील केळीच्या बागेतील सुमारे 4लाख किमतीचे 1हजार केळीचे घड कापून नुकसान केले आहे.
दरम्यान, मागील चार-पाच दिवसांपासून चिनावल परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतमालाची नासधूस करून कृषी सामग्री चोरी करून आर्थिक नुकसान केले जात आहे. शेतकऱ्यांचा पोलिसांवर रोष असून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात तक्रारी देखील केल्या परंतु पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नाही. असा आरोप देखील यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केला.नागरिकांनी संबंधित चोरट्यांच्या घराची झाडाझडती घेऊन त्यांच्याकडे असलेल्या शेतमालाची माहिती घ्यावी अशी देखील मागणी करण्यात आली वेळीच या प्रकरणाला आळा न घातल्यास कायदा सुव्यवस्थेला बाधा होऊन उद्रेक होऊ शकतो तरी पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी देखील शेतकरी करू लागले आहे.
केळी उत्पादक शेतकरी आधीच मोठ्या संकटांना तोंड देत असून रोज नव नवीन संकट त्याच्या समोर उभे राहत आहे पोलिसांनी दुर्लक्ष केले असून शेतकऱ्यांना अभय न दिल्यास लवकरच पोलीस स्टेशनवर प्रांत कार्यालयात बैलगाडी किंवा ट्रॅक्टर मोर्चा काढा असेदेखील उपस्थितांमध्ये चर्चा होती.
दंगा नियंत्रण पथकाच्या तीन तुकड्या डीवायएसपी विवेक लावंड सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड राजेंद्र पवार यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यावेळी चिनावल गावातील श्रीकांत सरोदे, गोपाल नेमाडे, पोलीस पाटील निलेश नेमाडे,तंटामुक्ती अध्यक्ष योगेश बोरोले,अन्यायग्रस्त शेतकरी कमलाकर भारंबे, तुषार महाजन, सागर भारंबे, ठकसेन पाटील, मनोज पालक, पंकज नारखेडे,गोपाळ पाटील, कमलाकर पाटील,पंकज पाटील, विनायक महाजन,कल्पेश नेमाडे, चंद्रकांत भंगाळे,बंसी धारसे,राहुल शेंडे, राजू पाटील, कुंदन पाटील,सुनील बोंडे, राहुल नारखेडे,संदीप महाजन, दिनेश महाजन, सूनील गाजरे, भास्कर सरोदे, दामोदर महाजन,किशोर महाजन, विलास महाजन, स्वप्नील पाटील, चंद्रकांत कापसे व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

महसूल विभाग अनभिज्ञ
शेतकऱ्याच्या शेतमालाचे नासधूस करून चोरीचा प्रकार मोठी गंभीर बाब असताना महसूल विभागाकडून मात्र कोणताही मोठा अधिकारी चिनावल गावात फिरकला नव्हता तर केळी करासाठी मात्र महसूल वेळोवेळी शेतकऱ्यांना धारेवर धरत असते या वेळी महसूल विभागाकडून सहानुभूती ची शेतकऱ्यांना अपेक्षा असताना महसूल विभाग मात्र या सर्व प्रकरणापासून अनभिज्ञ आहे.

शेतमाल चोरट्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास असून रात्री अपरात्री शेतकऱ्यांवर हल्ले होऊन जीविताला ही धोका असल्याने शेती करावी की नाही असा एक प्रश्न आमच्यासमोर उभा टाकला असल्याने तात्काळ त्या चोरांचा बंदोबस्त करण्यात यावा.
-कमलाकर भारंबे, पीडित शेतकरी चिनावल
आमच्या शेतमालाला सरकारकडून रास्त भाव मिळत नसला तरी किमान संरक्षण तरी द्यावे हा त्रास नेहमीचा झाला असून यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा
– तुषार महाजन शेतकरी चिनावल
शेतकऱ्यांचा वारंवार नुकसान होत असून चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा यासंदर्भात चिनावल येथे शेतकरी मोठा संतप्त झालेला आहे व आमच्या संयमाची परीक्षा न पाहता अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल,कारवाई करा अन्यथा गृहमंत्रालय पर्यंत जाऊ.
-पंकज नारखेडे, शेतकरी चिनावल
पोलिसांना सात दिवसाचा वेळ देण्यात यावा लवकरच पोलिसांकडून चोरट्यांचा बंदोबस्त करून प्रसंगी दरोड्याचे गुन्हे देखील दाखल करण्यात येतील
– विवेक लावंड , पोलीस उपविभागीय अधिकारी मुक्ताईनगर भाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here