ग्रीन ह्युमन फाउंडेशनतर्फे राबवण्यात येत आहे दररोज स्वच्छता मोहीम

0
13

जळगाव ः प्रतिनिधी
ग्रीन ह्युमन फाउंडेशनतर्फे दररोज स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. 29 मे रोजी फाउंडेशन व जेसीआय जळगावतर्फे सुभाष चौकात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात भवानी मंदिरापासून ते संपूर्ण दाणाबाजार परिसर स्वच्छ करण्यात आला.

महापौर जयश्रीताई महाजन यांनी ग्रीन ह्युमन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसोबत श्रमदान करत घंटा गाडीत कचरा टाकण्याचे आवाहन केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रियंका कौराणी, उपाध्यक्ष रूपाली किरंगे, सचिव काजल सैनी, सहसचिव हितेश शिंपी, जेसीआय जळगावचे अध्यक्ष भाग्येश त्रिपाठी, प्रथमेश दायमा, अशुतोष दायमा, वरूण जैन, प्रतीक सेठ, भूषण कासार, सूरज बिर्ला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here