ग्राहकाचे हित जोपासणारा नवीन ग्राहक संरक्षण कायदा पारितः अनिल गावित

0
27

चोपडाःप्रतिनिधी

ग्राहकांनी काळजीपुर्वक आणि सजग राहून खरेदी केली पाहीजे. सध्या लोकांकडे पैसा आहे पण वेळ कमी यामुळे धावपळीच्या जगात सर्व ग्राहकांनी वस्तू आणि सेवा खरेदी करतांना सजग बनून आपला हक्क तसेच केंद्र शासनाकडून ग्राहकाचे सर्वोच्च हित जोपासणारा नवीन ग्राहक संरक्षण कायदा पारित करण्यात आला आहे. या कायद्यामुळे ऑनलाईन खरेदी व भ्रामक जाहिरातींव्दारे ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणूकीस आळा बसणार आहे. या नवीन कायद्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवून जनजागृती गरज असल्याचे प्रतिपादन तहसीलदार अनिल गावित यांनी जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमांत केले.
ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा, याकरिता विविध ग्राहक संघटना लोकांना जागरूक करीत असतात या सर्वांसाठी 15 मार्च हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.याच दिनाचे औचित्य साधत चोपडा महसुल विभागातर्फे तहसील कार्यालयाच्या नविन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहामध्ये ऊत्साहात कार्यक्रम झाला. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतीचे प्रबोधन मंत्री विकास जोशी होते. कार्यक्रमांत अनिल पालिवाल,विकास जोशी, उदयकुमार अग्निहोत्री,राजेश खैरनार आदींनी ग्राहक चळवळीच्या ध्येय धोरण आणि उदिष्टांबाबत मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अनिल गावित ,ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे तालुका अद्यक्ष योगेश भिमराव महाजन, चहार्डी ग्राहक पंचायतीचे तालुका अद्यक्ष राजेश खैरणार,ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे संघटक कैलास महाजन,कार्याद्यक्ष समाधान माळी,शहर अद्यक्ष,संध्या महाजन,उपाद्यक्ष यशवंतराव बोरसे,अनिलकुमार पालिवाल, जितेंद्रकुमार शिंपी ,ग्राहक पंचायतीचे प्रबोधनमंत्री विकास जोशी,जिल्हा सचिव उदयकुमार अग्निहोत्री यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन कैलास महाजन यांनी तर आभार प्रदर्शन पुरवठा तपासणी अधिकारी देवेंद्र नेतकर यांनी केले. कार्यक्रमांत प्रधानमंत्री उज्वला गँस योजना संदर्भात माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here