जळगाव ः प्रतिनिधी
हरियाणा (पंचकुला) येथे 4 ते 6 जूनदरम्यान खेलो इंडिया स्पर्धा घेण्यात आली. यात जळगावच्या रुद्राक्षी भावे हिने योगासन आर्टिस्टिक गर्ल्स ग्रुप या गटात रौप्य पदक तर आर्टिस्टिक सोलो प्रकारांत कांस्य पदक पटकावले.
रुद्राक्षी ही ध्रू ग्लोबल स्कूल संगमनेर येथे स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिक्षण व योगाचा अभ्यास करत आहे. तिला डॉ. संजय मालपाणी, मंगेश खोपकर, प्रवीण पाटील, स्वप्निल जाधव, किरण वाडेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. ती प्रज्ञा अशोक नाईक यांची सुकन्या आहे.