जळगाव ; प्रतिनिधी
खान्देशसह जळगाव जिल्ह्यात सोमवार रात्री ७ वाजेपासून विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला असून हा पाऊस तीन दिवस राहणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे शेतकरी राजा पुन्हा चिंतेत सापडला आहे.
जळगाव जिल्ह्यात सोमवारपासून पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.
भुसावळ शहरासह परिसरात रात्री ८.३० च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. यासह बदलत्या वातावरणामुळे पुन्हा साथीचे आजार तोंड वढ काढण्याची शक्यता आहे