जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा पोलिस दलात स्व.अक्षय प्रकाश महाजन हे (क्युआरटी कंमाडो) कार्यरत होते. त्यांचा कोरोना काळात दुर्देवी मृत्यू ओढवला गेला. अशा या कोरोना योध्दाच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा पोलिस दलातर्फे नविन इमारतीत थंड पाण्याचा आर.ओ. तसेच शितशव पेटीचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक प्रविण मुंडे यांच्याहस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी स्व.अक्षय महाजन यांच्या पत्नी रिना अक्षय महाजन, चि.रिदम अक्षय महाजन हे उपस्थित होते. तसेच यावेळी पोलिस उपअधिक्षक संदीप गावीत, राखीव पोलिस दलाचे पोलिस निरिक्षक संतोष सोनवणे, तसेच 2014 च्या बॅचचे अंमलदार उपस्थित होते.



