Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»कांदा दरवाढीनंतर ईडीने छापे टाकल्यास
    कृषी

    कांदा दरवाढीनंतर ईडीने छापे टाकल्यास

    SaimatBy SaimatJune 16, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    येवला ः प्रतिनिधी
    नाफेडचा कांद्या विक्रीसाठी बाहेर पडू देणार नाही, वेळ पडल्यास तो जाळून नष्ट केला जाईल, असा इशारा देतानाच आयकर व ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाढीनंतर जर कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या तर त्यांचे हात तिथेच छाटू असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष ललित बहाळे यांनी येथे दिला.

    येथील बाजार समिती आवारात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे कांदा उत्पादन व व्यापार परिषद झाली. राज्यभरातून संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. येत्या 30 जूनपर्यंत वाणिज्य तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांची भेटीसाठी वेळ मागण्यात येईल. त्यानंतरही वेतन न मिळाल्यास हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन संसदेला घेराव घालण्याचा इशाराही ज्येेष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील व बहाळे यांनी दिला.

    ज्यांनी नाफेडला कांदा विकला त्यांनीही या आंदोलनात सामील व्हावे. बांगलादेशसारख्या देशाने सौदे पूर्ण केले जात नाही म्हणून आपला कांदा विकत घ्यायचा नाही, असा निर्णय घेतला. आखाती देशांनी सुद्धा येमेनमधून कांदा खरेदी सुरू केल्याने निर्यातबंदीच्या धोरणामुळे आपल्या कांद्यावर गदा आल्याची वेळ आल्याचे मत बहाळे यांनी व्यक्त केले.

    माजी आमदार वामनराव चटप म्हणाले की, जनतेच्या आशा आकांक्षाचे प्रतिबिंब जोपर्यंत सरकारमध्ये उमटत नाही तोपर्यंत सरकार जनतेसाठी निरुपयोगी असते. ज्येष्ठ नेते रामचंद्रबापू पाटील म्हणाले, जोपर्यंत जीवनावश्‍यक यादीतून कांदा वगळला जात नाही तोपर्यंत कांद्याचे भाव असेच कोसळत राहणार आहेत. महिला आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख सीमा नरवडे म्हणाल्या, केंद्र सरकार नेहमी निर्यातबंदीच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करत असल्याने कांद्याचे दर पडतात. नाफेड ही शेतकऱ्यांसाठी व्यवस्थाच नसून ही व्यवस्था बंद करायला हवी असे मत देविदास पवार यांनी मांडले.

    युवा आघाडीचे अध्यक्ष सुधीर बिंदू यांनी नाफेडचा कांदा विक्रीसाठी आणल्यास त्याच ठिकाणी तो जाळून टाकू, नाफेडची राज्यातील कार्यालये बंद पाडू असा इशारा दिला. शंकरराव ढिकले यांनी ठराव मांडले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026

    Citrus Fruit Plants : लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी : डॉ. एन. के. कृष्णकुमार

    December 23, 2025

    ‘Green Color Day’ : काशिनाथ पलोड पब्लिक स्कुलमध्ये ‘ग्रीन कलर डे’ साजरा

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.