जळगाव ः प्रतिनिधी
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चाकण शाखेने कविता, काव्य, कादंबरी अशा तिन्ही प्रकारातील पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात जळगाव येथील कवयित्री उषा हिंगोणेकर यांच्या ‘धगधगते तळघण’ काव्यसंग्रहाला साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाला.
मसापच्या चाकण शाखेने जाहीर केलेल्या पुरस्कारांत काव्य प्रकारात अभिषेक नाशिककर (समांतर), सिराज करिम शिकिलकर (गझलचाँद), उषा हिंगोणेकर (धगधगते तळघर), रावसाहेब जाधव (गरगर मोळ्या : बालकाव्य), कथासंग्रहात दयाराम पाडलोस्कर (बवाळ), रश्मी गुजराथी (जाणीव : बालकथा संग्रह), कादंबरीत चकोर शहा (दोसतार), विशेष प्रकारात प्रा. डॉ. सुहासकुमार बोबडे (मराठी कविता : परंपरा आणि प्रवाह), स्थानिक साहित्य प्रोत्साहनपर ॲड. नाजिम गुलाब शेख (क्षमाशीलता) यांच्या साहित्यकृतींचा समावेश आहे. रविवारी दुपारी 4 वाजता चाकण येथील श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात पुरस्कारांचे वितरण होईल, असे आयोजकांनी कळवले आहे.