कबचौउमवित होणारा युवारंग युवक महोत्सव रद्द करा

0
16

जळगाव : प्रतिनिधी 
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे यंदा आंतर महाविद्यालयीन “युवारंग युवक महोत्सव” हा दि . १९ एप्रिल ते २४ एप्रिल २०२२ ह्या तारखांना  होणार युवक महोत्सव  तूर्त रद्द करावा अशी मागणी कुलगुरूकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे  माजी जिल्हाध्यक्ष ॲड कुणाल पवार , जिल्हाध्यक्ष भुषण भदाने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहेकी, भर उन्हाळ्या मध्ये सुमारे ४४ ते ४५ अंश सेल्सियस तापमान ज्यामुळे सध्या महाराष्ट्रात जळगाव जिल्हा रोज चर्चेत आहे त्या तापमानामध्ये ऐन परिक्षांच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व शैक्षणिक हिताचा विचार न करता  विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे युवारंग युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे.त्यामागे कोणाचे कोणते आर्थिक फायदे आहेत हे न समजणारे कोडे आहे.
यंदा युवारंग युवक महोत्सव तूर्त रद्द करण्यात यावा कारण  महाविद्यालयांना किमान  दोन महिने अगोदर युवारंगाच्या तारखा कळवाव्या लागतात . त्यामुळे स्पर्धक विद्यार्थ्यांची संबंधित स्पर्धेसाठी  निवड चाचणी ( ऑडिशन ) घेऊन निवड करावी लागते.  अश्या निवड केलेल्या विद्यार्थ्यांना सरावासाठी किमान १ महिना कालावधी आवश्यक असतो.त्यामुळे ते पडद्यावर चांगला अभिनय करू शकतात.
करोनाच्या  पार्श्वभूमीमुळे व एस .टी . च्या संपामुळे सर्वच महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ही समाधान कारक नाही . त्यात बहुतेक महाविद्यालयामध्ये अंतर्गत परीक्षा सुरू झालेल्या आहेत . तसेच  हवामान खात्याने उष्णतेची लाट येण्याचे भाकित केलेले आहे . प्रखर उन्हामुळे व  पिण्याच्या पाण्याचा दुर्भिक्षा मुळे उष्माघाताच्या संभव आहे .  यंदा करोना मुळे महाविद्यालय व विद्यापीठ विद्यार्थी परिषद गठीत झालेली नाही. त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्गास अडचण होत आहे.
या बाबींचा सकारात्मक विचार करता, युवारंग युवक महोत्सव ह्या काळात आयोजन करणे योग्य होणार नाही . म्हणुन यंदा युवक महोत्सव न घेता पुढील वर्षात तो डबल ताकदीने घेण्यात यावा. तसे न झाल्यास विद्यार्थी वर्गाची जीवाची जबाबदारी आपण घ्यावी जेणे करून त्यांना उष्माघात , रस्तेवरील काही समस्या , राहण्याचा , पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,उद्भवल्यास त्यातून काही हानी झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाने घ्यावे असेही म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here