साईमत जळगाव प्रतिनिधी
येथील आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
*संस्थाध्यक्ष आबासाहेब शिवाजीराव पाटील, सचिव डॉ. चंद्रशेखर पाटील, मुख्याध्यापक उमाकांत बुंदेले, दीपक पाटील यांच्या हस्ते दीप्रज्वलन तसेच देवी सरस्वती आणि आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना “स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व वीर बिरसा मुंडा यांचे जीवनचरित्र” यावर मार्गदर्शन केले. इ. 2 री ते 12 वीच्या मीरा पावरा, वैष्णवी चौरे, गायत्री राऊत, गंगा बागुल, मनीषा ठाकरे, अजय पावरा, रोशन पावरा, प्रगती पावरा, भाग्यश्री, विनायक चौधरी, नाजिया, रेशली इत्यादी अनेक विद्यार्थ्यानी वीर बिरसा मुंडा यांना आपल्या वक्तृत्वाद्वारे, लोकनृत्य, लोकगीत, लोकनाट्य या कलांद्वारे आदरांजली अर्पण करून निसर्गपुजक आदिवासी संस्कृतीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
विद्यार्थ्यानी आपल्यातील सुप्त गुणांचे ही सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा सोनावणे यांनी केले. या प्रसंगी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.